Friday, July 27, 2007

साऊथ इंडियन खाना

विद्यापीठात सध्या साऊथ इंडियन डिशेसची चांगलीच चलती आहे. खुद्द व्हीसींनाच (व्हीस्की नव्हे) साऊथ इंडियन डिशेसची चटक लागली आहे. इडली, डोसा, वडा - सांबर या डिशेस बहुधा त्यांना आवडत असाव्यात, पण छ्या ! यापैकी काहीच नाही. ते तर भलत्याच डिशेसच्या प्रेमात पडले आहेत.

खरंतर आपण मराठमोळी माणसं....पुरण पोळी, चपाती भाजी आणि खुपच झालं तर चटणी - भाकरी अन्‌ सोबत कांदा. हेच खाणं आपल्या पचणी पडणार. पण व्हीसींना साऊथ इंडियन डिशेस भलत्याच स्वादिष्ठ वाटू लागल्याबद्दल विद्यापीठातील तमाम मराठी जनांना काळजी वाटायला लागली आहे. विष्णू नंदा मगरे यांचा जीव अगदी कासावीस होऊ लागला. आपण कॅन्टिन कमिटीचे प्रमुख असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला, अन्‌ ते हलत डुलत "येडींकडे' गेले.

काळजीच्या सुरात त्यांनी "येडींजवळ' व्हीसींच्या साऊथ इंडियन प्रेमाबद्दल गाऱ्हाणे गायले.
येडी कुरकरले, त्यांना मराठी नको आहेत, मग आपण कशाला चिंता करायची ?
मग आपलं कसं होणार ? : विष्णू नंदा.
""वळसे - पाटलांची माझ्यावर कृपा आहे, तोपर्यंत मला काही चिंता नाही. तुमचं तुम्ही बघा "" असं सांगत येडींनी विष्णू नंदाना पिटाळले.
आपल्याला कुणी वालीच नाही, पुन्हा कीर्तीची वाट धरलेली बरी..असं पुटपुटत (येडींना ऐकू जाणार नाही अशा आवाजात) ते निघून गेले.

एव्हाना, व्यंकटेशकुमारची गडबड चालू झाली होती. सकाळी सकाळीच त्याने बाजारातून दूधाची एक पिशवी, दोन तीन प्रकारच्या (साऊथ इंडियन) भाज्या बंगल्यावर आणून ठेवल्या होत्या. व्हीसी साहेबांचे इस्त्रीचे कपडेही त्याने आणले होते. साहेबांची आंघोळ होईपर्यंत त्याने आंबेडकर भवनकडे धाव घेतली. व्यंकटेशच्या अगोदरच पद्‌नाभन आपल्या कार्यालयात हजर होते. कसल्या तरी फायली उलट्या पालट्या करण्यात ते गुंग होते. पद्‌नाभनकडे पाहत व्यंकटेशने स्मितहास्य केले, आणि तो सरळ व्हीसींच्या केबिनमध्ये घुसला.
त्या (मराठी) शिपायाला दरडावल्याचा राग आला.पण काय करणार ?
अडला नारायण मद्राशाचे पाय धरी, अशी त्याची अवस्था झाली.

तिकडे डॉ. शिवारे (एमपीएससीवाले) हिंदुजात न जाता विद्यापीठात जाण्याची तयारी करत होते. व्हीसींचा मोबाईल काही केल्या लागत नव्हता, म्हणून त्यांनी व्हीसींच्या कार्यालयातच फोन लावला.
टेबलावर रिंग वाजताच व्यंकटेशने पुढे होऊन फोन उचलला.
"" हालो...मी सिवारे बोलतोय, यंकट का तू (व्यंकटेशच्या आवाजावरुन त्यांनी ओळखले होते.)
व्यंकटेश : येस...! वॉट हॅप्पन ?
आरं बाबा मै बहुत टाईमसे व्हीसीसाब को मोबाईल लगाने की कोसिस कर रहा हू . कहा है वो ?
व्यंकटेश : अSSS आज ते येणार नाहीत.
डॉ. शिवारे : आरंपण त्ये मला आज भेटणार व्हते.
वेंकटेश : बट, ओ नही आनेवाले है.
काय पिढा आहे ही..अस ंपुटपुटत शिवारेंनी फोन ठेवून दिला.

एवढ्यात व्यंकटेशचा मोबाईल वाजला. मोबाईलवर व्यंकटरमनींचे नाव बघून (प्रभारी) त्याला प्रसन्न वाटलं.
कॉल रिसीव्ह करुन तो म्हणाला : यन्ने, गुड्ड मॉर्निंग !
पलीकडून : व्यंकट्‌अ, व्हीसी आये क्‍या? मै एक घंटा देरसे आनेवाला हूॅ , इसलिए पुछा!
आपल्या माणसाला आपणच सांभाळले पाहिजे, अशी भावना मनात ठेवत व्यंकटेश म्हणाला,
हा ओ आनेवाले है, लेकिन आप चिंता मत करो मै बता दूंगा उनको. और जरा जल्दी आने की कोशिश करो..आपनी मिटिंग है ना आज

व्यंकटेशची धांदल चालूच होती. त्याने इकडेतिकडे (व्हीसींच्या ऑफिसमधून फुकटातले) फोन फिरवायला सुरवात केली. पार्वती व्यंकटेश, जोस जॉर्ज या सगळ्यांनी लवकर वेळेत पोहोचावे म्हणून त्याची खटपट चालू होती. नंतर अभय पेठे, प्रकाश वाणी, संदीप सहारे यांच्यासोबत 1 वाजता व्हीसींची मिटींग ठरली असल्याने त्या अगोदरच त्याला आपली बैठक उरकून घ्यायची होती. शिवाय एक वाजताच त्याला एक महिला पत्रकारही भेटायला येणार होती.

मिटींगचा विषय होता, "सुवर्णअण्णा व त्याचे पुनवर्सन.'

No comments: