विद्यापीठात "गोखले' नावाचे एक नकलाकार आहेत. तशी त्यांची नेमणुक "उपकुलसचिव' म्हणून झाली आहे. पण आपल्या भन्नाट नकलांनी त्यांनी विद्यापीठात नावलौकीक प्राप्त केला आहे. विद्यापीठातील सहकाऱ्यांचे मनोरंजन करण्यात ते चांगलेच पटाईत आहेत. व्हीसी (व्हीस्की नव्हे) आणि येडी (दोन नंबरवाले) यांच्या दरबारतही त्यांनी आपल्या नकलांची अनेकदा झलक पेश केली आहे. आम्ही त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा, या गुणी कलाकारांबद्दल आम्हाला काहीच कल्पनाच नव्हती. (अरेरे किती आमचे हे अभागीपण !)गोपाळ कृष्ण गोखले, अरविंद गोखले अशा विद्वानांच्या यांदीतील हे अजून एक "गोखले' असावेत. किमान रानडे, पेठे, कर्णिक (मुग्धा किंवा शशिकांत), पेंडसे, राजहंस, गणाचारी यांच्यापैकी कुणाचे तरी ते नातलग नक्कीच असावेत याची आम्हाला मनोमन खात्री होती. किमान चार - पाच तरी पीएचडी त्यांनी सहज मिळविल्या असतील याबद्दल आम्हाला यत्कींचितही शंका नव्हती. आश्चर्य याचेच होते की, नावापुढे ते "डॉ.' (डॉग नव्हे डॉक्टर) का लावत नाहीत.
मनोभावाने आम्ही त्यांना भेटावयास गेलो. दरवाजातून डोकावून आदबीने विचारले,
सर, आत येऊ का ?
नको... गोखल्यानीं ठसक्यात सांगितले.
सर, जरा कामं होतं.
कसंनुसं तोंड करीत ते म्हणाले, या !
आम्ही आदरयुक्त अवघडलेल्या अवस्थेत समोरच्या खूर्चीत बसलो. एव्हाना त्यांनी घेतलेल्या "पंचामृताचा' सुगंध आमच्या नाकापर्यंत येऊन पोहचला होता. येताना रस्त्यातील एखाद्या मंदिरात हे "पंचामृत' मिळाले असावे, असा पुज्यभावे विचार आमच्या मनाला स्पर्शून गेला. आमचे गाऱ्हाणे मांडणार तेवढ्यात त्यांनी प्रवचन सुर केले.
आपल्या समाजातील लोकांनी पुढे गेले पाहीजे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपला पाहीजे.......! आमची बोबडी वळणेच आता बाकी राहीले होते.
त्यांचे प्रवचन संपण्यापूर्वीच आम्ही बाहेर पडलो...मोबाईल वरुन इकडे तिकडे फोन केले. त्यानंतर समजले. त्यांनी बारसे घालून गोखले हे आडनाव धारण केले आहे.
मोबाईल बंद करणार एवढ्यात पलिकडच्या आवाजाने सांगितले, ते गोखले....कन्नड भाषिक आहेत....!
Saturday, July 28, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Good dispatch and this mail helped me alot in my college assignement. Gratefulness you as your information.
Post a Comment